Pune : नाराज नाही, पक्षाने खूप दिले – खासदार अनिल शिरोळे

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाने आजवर मला खूप दिले. चारवेळा नगरसेवक, दोनवेळा पक्षाचे शहराध्यक्षपद आणि एकवेळा खासदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी दिली. याबाबत मी पक्षाचा कृतज्ञ आहे. आपण नाराज झालो नसून मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे जोमाने काम करणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी मध्यरात्री जाहीर झाली. पुण्याची उमेदवारी पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आली आहे. विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करण्यात आला.

याबाबत बोलताना अनिल शिरोळे म्हणाले, ”भारतीय जनता पक्षाने आजवर मला खूप दिले आहे. देशाच्या लोकसभेत काम करण्याची संधी दिली. चारवेळा नगरसेवक, दोनवेळा पक्षाचे शहराध्यक्षपद दिले. एकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी दिली. याबाबत मी पक्षाचा कृतज्ञ असून उमेदवारी न मिळाल्याने आपण नाराज नाही. पार्टी खूप मोठी आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे मी जोमाने काम करणार असल्याचे” त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.