Pune : मी महापालिकेचे एकही किट घेतले नाही : हेमंत रासने

I did not take any municipal kit: Hemant Rasane

एमपीसी न्यूज – माझ्या प्रभागात पुणे महापालिकेचे एकही किट घेतले नाही. स्वतः खर्च करून अन्नधान्याचे किट वाटप करीत असल्याचे स्पष्टीकरण स्थायी समिती सभापती हेमंत रासने यांनी ‘एमपीसी न्यूज’ शी बोलताना दिले आहे.

हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणातून कोरोना लढाईत प्रत्यक्ष काम करणा-या भारतीय जनता पक्षाच्या व पुण्यातील १ हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह ३ हजार जणांना टप्याटप्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

रासने पुढे म्हणाले, माझा शनिवार पेठ – सदाशिव पेठ 15 नंबर प्रभाग हा कंटेन्मेंट झोन नाही. त्यामुळे मी महापालिकेची 1 ही किट घेतले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. या काळात प्रत्येक कार्यकर्ता गरजूंसाठी कार्यरत आहे.

विद्यार्थी, प्रवासी, मजूर, हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये, यासाठी भाजपाने व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा सन्मान २५ किलो किटमध्ये २५ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू देऊन करण्याचा आम्ही संकल्प केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.