Pune : मला दिल्लीत जायचे नाही, महाराष्ट्रातच रहायचे आहे -संजय काकडे

एमपीसी न्यूज – राज्यसभेची उमेदवारी मला न मिळाल्याने मी नाराज नाही. मला दिल्लीत जायचे नाही, मला महाराष्ट्रातच रहायचे आहे, असे स्पष्टीकरण खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

काकडे म्हणाले, मी 2 एप्रिलपर्यंत भाजपचा सहयोगी सदस्य आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पडणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश सर्वच माहिती आहे. मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतील नव्हे तर महाराष्ट्रातीलच जबाबदारी देण्याची विनंती केली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, भाजप सर्वच पक्षात माझे मित्र असल्याने मी 2014 मध्ये राज्यसभेचा खासदार झालो होतो.

उदयनराजे भोसले यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास त्यांना राज्यसभेचा शब्द दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणल्याचे काकडे यांनी सांगितले.

शून्यातून वर आलेल्या डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली. दिल्लीतूनच हा निर्णय झाला. जेष्ठ नेते एकनाथ खडसे सुध्या इच्छुक होते. माझ्या ऐवजी त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती.

भाजपचे सहयोगी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, उदयन राजे यांनाही संधी देण्यात आली. मी सहयोगी असल्याने मला संधी मिळाली नाही. महाराष्ट्रात जोमाने काम करू. येत्या काही दिवसांत चांगली जबाबदारी मिळेल, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.

रिंग रोड, मेट्रोच्या प्रश्नासाठी आपण पाठपुरावा केला. तर, मध्यप्रदेश पॅटर्न राज्यात अवघडही नाही. सत्ता स्थापनेसाठी 1 पक्षच आम्हाला सोबत घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • आमदार अनिल भोसले यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट
    आमदार अनिल भोसले यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट विषय आहे. मला त्याबाबत जास्त बोलायचे नाही. हे प्रकरण दोन वर्ष सुरू होते. भोसले यांनी वैक्तिक कामासाठी पैसे घेतले असतील तर ते परत देतील, असेही काकडे यांनी सांगितले. तर, येस बँकेत माझेही पैसेही आहेत, असेही ते सांगण्यास विसरले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.