Pune : मी तुला दुखावलं, मला माफ कर… भावासाठी चिठ्ठी लिहून बहिणीचं टोकाचं पाऊल

एमपीसी न्यूज-पुण्याच्या दौंड परिसरातून एक दुर्दैवी घटना ( Pune )उघडकीस आली आहे. 17 वर्षाच्या बहिणीने भावाच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवत टोकाचा निर्णय घेतला. बहिणीला भीमा नदी पात्रात उडी मारून स्वतःला संपवलं. नाजूका शामराव ननावरे असे या बहिणीचे नाव आहे. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, नाजुका चा भाऊ हा पुण्यात कामाला आहे. त्याला नाजूकाने भीमा नदी पात्रात उडी मारली असल्याची माहिती मिळाली होती. त्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नाजुकाची दुचाकी त्या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर नातेवाईकांनी नदीपात्रात शोध घेतला असता नाजुकाचा मृतदेह आढळला.

PCMC :  विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

दरम्यान या घटनेनंतर नाजूका हिने आपल्या भावासाठी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ” मी तुला दुखावला आहे। मला माफ कर, तुला दुखावल्याने मला असं वाटतं की माझा जगून काहीच उपयोग नाही. तुझं मन मोठे आहे म्हणून तू माझ्यासाठी एवढं सगळं करतो. यासाठी मी तुझी आभारी आहे. मला तुझी प्रगती होताना बघायचं. पण जाऊ दे, तू स्वतःची काळजी घे.” असे तिने चिठ्ठीत लिहिले होते. दरम्यान नाजुकाच्या या अशा अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककाळा पसरली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.