Pune: मी भाजपचे आदेश पाळलेत, त्यामुळे मलाच राज्यसभा उमेदवारी मिळेल – संजय काकडे

एमपीसी न्यूज – मी स्वतः भारतीय जनता पक्षाचे दीड लाख सभासद नोंदवले आहेत..2019 ची लोकसभा असो अथवा विधानसभा असो देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आदेश मी पाळले त्यामुळे राज्यसभा मलाच मिळेल.पण, अंतिम निर्णय पक्ष घेईल, असे व्यक्तव्य भाजपचे संजय काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

काकडे म्हणाले, उदयनराजेंच पक्षाला अस काही योगदान दिले नाही.ते भाजपमध्ये आले, निवडणुकीला उभे राहिले आणि पडले.त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार होईल, असे वाटत नाही. उदयनराजे फक्त भोसले आहेत म्हणून ते सरस आहेत, असं होऊ शकत नाही. भारतातला मी एकमेव असा माणूस आहे की अपक्ष असतानाही निवडून आलो. ते छत्रपतीचे वंशज असले तरी आम्हीही महाराजांचे वंशज होतो.

पण, उदयनराजेंना 80 वर्षांच्या व्यक्तीने पाडलं जो दहा वर्षं राजकारणात नव्हता. माझ्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच मोदी आणि शहा. मी त्यांना म्हटलं की तुम्हीच माझ्या वतीनं मोदी, शहांना भेटा. उदयनराजे भोसले आहेत म्हणून उमेदवार होउ शकत नाही. तसा निकष लावला तर आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. संजय काकडे हे शिवाजी महाराजांचे सुभेदार होते.

मला माध्यमातून असं कळतंय की, उदयनराजे भोसले यांची उमेदवारी नक्की झालीय. पण, उदयनराजे यांचं योगदान काय?. उदयनराजे पक्षात आले आणि पडले. त्यांना त्यांचा भाऊ वगळता इतर आमदारही निवडून आणता आला नाही. महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला पुण्यात मिळालेले यश पाहता पक्ष माझा विचार करेल.

HB_POST_END_FTR-A2
You might also like