Pune : ‘कोरोना’ची लक्षणे असल्यास खासगी वाहनांऐवजी रुग्णवाहिकेचा वापर करा -रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज – विदेशातून आल्यावर प्रवाशांना ‘कोरोना’ची लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी खासगी वाहनांचा वापर न करता रुग्णवाहिकेचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये येताना कुठल्याही खासगी वाहनाचा किंवा कॅबचा वापर करू नये. त्यापेक्षा पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी करावी. या रुग्णवाहिकेतूनच हॉस्पिटलमध्ये यावे़. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा संसर्ग इतरांना होणार नाही.

सध्या महाराष्ट्र शासनाच्या १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिकेबरोबरच महापालिकेच्या १० स्वतंत्र रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

डॉ. नायडू हॉस्पिलमध्ये सर्दी-खोकला झालेल्या नागरिकांनी तपासणीसाठी विनाकारण गर्दी करू नये. तसेच, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, स्वयंशिस्तीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असेही अग्रवाल यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.