BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जर माझ्याकडून सिग्नल तुटल्यास सॉरी म्हटल्यावर सोडून द्या – खासदार सुप्रिया सुळे

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील मुलींना शरद पवार यांच्या हस्ते सायकल वाटप कार्यक्रम पार पडला. 

त्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मुलींना सुप्रिया सुळेंचा प्रश्न कोणाला काय व्हायचे,?असे विचारले असता.  कोणाला आमदार, खासदार,  जिल्हाधिकारी, पोलीस व्हायचे तर त्यातील एका मुलीनं खासदार व्हायचे असे म्हणताच. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता माझा प्रचार करायचा मग तुला खासदारकीचे टिकीट देऊ, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

तर मुलींनो खूप मोठे व्हावा, पण मोठे झाल्यावर मला विसरु नका, कोणी पोलीस झाले आणि जर माझ्याकडून सिग्नल तुटल्यास सॉरी म्हटल्यावर मला सोडून द्या, असे म्हणताच पुन्हा हशा पिकला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील 6 हजार मुलींना सायकलचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.