Pune : विधानसभेच्या ‘पुन्हा’ निवडणुकीची नवनिर्वाचित आमदारांना धास्ती!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली तर, आपल्या आमदारकीचे काही खरे नाही, याची धास्ती नवनिर्वाचित आमदारांना लागली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ‘कोट्यवधी’ रुपयांचा चुराडा झाला आहे. तेव्हा कुठे हे पद मिळाले, अशा भावना काही आमदारांनी खासगीत बोलताना व्यक्त केल्या.

तर, ज्यांचा मतदारसंघांत पराभव झाला, त्यांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मुदतपूर्व निवडणुका लागणार असल्याचा प्रचार सुरू केला आहे. भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरली. आज राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्यासाठी रात्री 8.30 पर्यंत वेळ देण्यात आली आहे. या पक्षानेही सरकारन स्थापन केले नाही तर, परिस्थिती अवघड होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत राष्ट्रवादीने भाजपचा पराभव केला. खडकवासला मतदारसंघात तर भीमराव तापकीर केवळ 2600 मतांनी विजयी झाले. पर्वती आणि कसबा पेठ मतदारसंघांत भाजपच्या मताधिक्यात घट झाली. तर, बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष केवळ 25 हजार मतांनी विजयी झाले. चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार गिरीश बापट यांना 1 लाख 20 हजार मतांचे लीड होते. शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघांत केवळ 5 – 5 हजार मतांनी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.