Pune : उदयनराजे यांचा पराभव झाला तर, भाजपला फळे भोगावी लागणार; मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या प्रतिनिधींचा इशारा

लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे महाराजांना 100 टक्के पडण्याचा भाजपचा डाव; भाजप सरकारने मराठा समाजाची केली फसवणूक

एमपीसी न्यूज – उदयनराजे यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला तर, भाजप सरकरला फळे भोगावी लागतील, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चा तर्फे देण्यात आला आहे. महाराज मराठा समाजाची अस्मिता आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आहे. तसेच या सरकारने आमची फसवणूक केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. महाराजांना 100 टक्के पडण्याचा डाव भाजपचा असल्याचेही ते म्हणाले.

पुण्यातील पत्रकार भवन येथे मराठा क्रांती ठोक मोर्चा तर्फे मंगळवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी राज्य समन्वयक महेश डोंगरे, संजय सावंत, बबन सुद्रीक, भगवान माकने, सतीश वेताळ, लक्ष्मणबापू शिरसाठ, दत्ता मोरे, अमित घाडगे, हरिभाऊ बोडके, गजाननाची देठे, राजेंद्र गरड, शरद गायकवाड, कांतीलाल गिरे, शिवराज जोगदंड, अजित जाधव आदी उपस्थित होते.

नाशिकच्या सभेत उदयनराजे महाराज यांचा अवमान करण्यात आला. पण, ते बोलू शकत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री महादेव जानकर यांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठा क्रांती ठोक मोर्चा कोणतीही निवडणूक लढणार नाही. जो कोणी समाजाच्या नावावर निवडणूक लढवेल, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशाराही यावेळी भरण्यात आला.

मोर्चात 42 बांधव हुतात्मे झाले. त्यांचा नातेवाईकांना नोकरीवर घेण्यात आले नाही. 10-10 लाख मदत करणार असल्याचे सांगितले होते. मराठा समाजाचा 13 हजार मुलांना नोकऱ्या देणार असल्याचे जाहीर केले होते. पण, जाचक अटी टाकून नोकऱ्या मिळू दिल्या नाहीत, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.