Pune : संविधान टिकवायचे असेल तर काँग्रेसला बळ द्या – डॉ सिध्दार्थ हत्तीअंबिरे

एमपीसी न्यूज – देशामध्ये एक प्रकारे हुकुमशाहीचे(Pune) राज्य सरकारी यंत्रणा चा गैरवापर करून विरोधी पक्ष संपवण्याचे कटकारस्थान करून एक प्रकारे घटना संपवण्याचे काम RSS प्रणित भाजपा सरकार करत आहे.

त्यामुळे एक प्रकारे सर्वच जाती धर्माचे अस्तित्व(Pune) धोक्यात आले असून जतिजातीत भांडणे लावून आपली पोळी भाजून घेण्याच काम भाजपा सरकार करत आहे. त्यामुळे भविष्य काळात जर संविधान टिकवायचे असेल तर अनुसूचित विभागाच्या तमाम घटकांनी काँग्रेसला बळ देणे सध्या क्रमप्राप्त असून त्या दृष्टीने सर्वांनी सज्ज राहावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु विभागाचे अध्यक्ष डॉ सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांनी केले.

आज प्रदेश काँग्रेस अनु जाती विभागाच्यावतीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा ग्रामीण विभागची आढावा बैठक काँग्रेस भवन छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

Mp Shrirang Barne : अमृत भारत अंतर्गत चिंचवड,देहूरोड, लोणावळा रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट

यावेळी बैठकीस माजी नगरसेवक अजित दरेकर, रफिक भाई शेख, शिक्षण मंडळांच्या माजी सभापती संगीता तिवारी, प्रदेश अनु विभागाच्या उपाध्यक्ष प्रियांका रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष ऍड. राहुल साळवे, पवन बोधी, कविराज संघेलिया, ज्ञानेश्वर कांबळे, पुणे शहर अध्यक्ष शिलार रतनगिरी, पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजय कांबळे, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,महिला अध्यक्ष सुंदरताई ओव्हाळ, यांच्या सह पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते या बैठकी मध्ये अजित दरेकर, संगीता ताई तिवारी, विठ्ठल गायकवाड, ज्ञानेश्वर कांबळे, शीलार रतनगीरी यांच्या सह अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी शहर काँग्रेस च्या वातीने तसेच अनु जाती विभागाच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्यावतीने हत्तीअंबिरे यांचा सन्मान सत्कार केला. बैठकीचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश अनु जाती विभागाचे उपाध्यक्ष सुजित अप्पा यादव यांनी केले तर आभार हेमंत राजभोज यांनी मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.