Pune  : ‘कृष्णा अँड  हिज लीला’ चित्रपटावर तातडीने बंदी घाला : बाबा धुमाळ

Immediate ban on 'Krishna and His Leela': Baba Dhumal :'कृष्णा अँड  हिज लीला' चित्रपटावर तातडीने बंदी घाला

एमपीसी न्यूज – नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘कृष्णा अँड हिज लीला’ या चित्रपटावर तातडीने बंदी घालण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे  माजी अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांनी  पत्रकार परिषदेत केली. 

या बाबत धुमाळ ,म्हणाले, भगवान श्रीकृष्ण आणि माँ राधा यांच्यावर आमची श्रद्धा आहे. या चित्रपटात दोघांच्या व्यक्तिरेखांची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे कोट्यवधी श्रीकृष्णा भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

दि. 25 जून रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. हा तेलगू चित्रपट असून, भगवान श्रीकृष्ण आणि माँ राधा यांची या चित्रपटात विटंबना करण्यात आली आहे.

आमच्या सारख्या कोट्यवधी भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या चित्रपटावर तातडीने शासनाने बंदी घालावी. तसेच संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी धुमाळ यांनी केली आहे.

या चित्रपटावर तातडीने बंदी घातली नाही तर, आम्ही श्रीकृष्ण भक्त मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

या चित्रपटात हिंदू देवदेवतांचा अवमान करण्यात आला आहे.  भगवान श्रीकृष्ण, माँ राधा या आमच्या भावनांशी निगडित आहे. या चित्रपटात  चुकीच्या पद्धतीचे  संवाद असल्याने आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कोट्यवधी श्रीकृष्ण भक्त नाराज आहेत, असेही  धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.