Pune : डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी भरती प्रक्रिया तात्काळ राबवा : दीपाली धुमाळ

Immediate implementation of recruitment process for doctors, nurses and health workers: Deepali Dhumal : डॉक्टर, नर्सेस अभावी रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने मुलाखती घेऊन वेळेचा विलंब न करता तातडीने डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले आहे. सध्याच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत प्रशासनाने जलद गतीने भरती प्रक्रिया राबविणे अपेक्षित असताना त्याप्रमाणे काम होत नसल्याबाबत धुमाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे 23 हजारांहून अधिक रुग्ण झाले आहेत. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होताना जागा शिल्लक नाही, असे उत्तर मिळते, ही वस्तुस्थिती आहे.

_MPC_DIR_MPU_II

या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून वेळीच डॉकटर, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांची वेळीच भरती प्रक्रिया राबविली नाही.

ही प्रक्रिया राबविली तेव्हा 45 दिवसांच्या कालावधीसाठी भरती घेतली. त्यातही अनामत रक्कम घेणार असल्याने आणि अनुभवाचा कालावधी जास्त मागितल्याने या भरती प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर अनुभवाचा कालावधी कमी करणे आणि 45 दिवसांच्या भरती प्रक्रियेचा कालावधी पुन्हा 6 महिन्यांपर्यंत वाढवून जाहिरात दिली. वास्तविक प्रशासनाने सर्वप्रथम भरती प्रक्रिया घेताना याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे होते.

याबाबत प्रशासनाने खबरदारी न घेता कार्यवाही केल्याने वेळेत डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफ न मिळाल्याने कोरोना रुग्णांना उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात जावे लागले, ही गंभीर बाब असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like