Pune: मृत सेवकांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच योजनेचा तातडीने लाभ द्या- दीपाली धुमाळ

Pune: Immediately give the benefit of security cover scheme to the families of the deceased servants demand by Deepali Dhumal पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या काळात पुणे महापालिकेचे कर्मचारी-अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकट काळात मृत पावलेल्या पुणे महापालिकेच्या सेवकांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच योजनेचा लाभ तातडीने द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

पुणे महापालिकेच्या 12 सेवकांचा मृत्यू झाला आहे. या सेवकांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यासाठी मुख्य सभा मान्यता देईल, या भरवशावर कार्यवाही करण्यात यावी, असेही धुमाळ यांनी म्हटले आहे.

पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या काळात पुणे महापालिकेचे कर्मचारी-अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा कवच योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

ही योजना अंमलातही आणली आहे. यानुसार पुणे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास सुरक्षा कवच योजनेनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाकडून मुख्य सभेची मान्यता घेतल्याशिवाय मृत सेवकांच्या नातेवाईकांना सुरक्षा कवच योजनेचा लाभ देता येणार नाही, असे सांगितले जात आहे.

एकीकडे मुख्य सभा होऊ शकत नसल्याने प्रशासनाने महाराष्ट्र महापालिका अधिनियम 67 (3) (क) नुसार खरेदी प्रक्रिया होते. अशा खरेदी करताना प्रशासन कार्यतत्परतेने काम करीत आहे.

मृत सेवकांच्या कुटुंबीयांना सुरक्षा कवच योजनेचा लाभ देण्यासाठी मात्र विलंब होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सुरक्षा कवच योजनेला मंजुरी होऊन परिपत्रक देखील प्रसूत झाले आहे.

तरीही, महापालिका आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असेही दीपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like