Pune : पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

Implementation of strict lockdown in Pune अत्यंत कडकपणे लॉकडाऊन पाळण्यात येत असल्याने पुणे शहरातील सर्वच रस्ते सुनसान झाले आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी आजपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन लागू केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्वच दुकाने, टी स्टाॅल, हाॅटेल्स बंद असल्याने अनावश्यक गर्दी नाही.

अत्यंत कडकपणे लॉकडाऊन पाळण्यात येत असल्याने पुणे शहरातील सर्वच रस्ते सुनसान झाले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांची रोजची वर्दळ कायम आहे. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी 23 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. शहरात कोरोनाचे आता 28 हजार 357 रुग्ण झाले आहेत. 18 हजार 96 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 9 हजार 412 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 849 नागरिकांना या विषाणूमुळे आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.

लॉकडाउनच्या काळात जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करून वैद्यकीय सुविधा आणखी सक्षम करण्यात येणार आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे, यासाठी पोलिसांचा जागोजागी तगडा बंदोबस्त आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे.

जागोजागी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे दुचाकी, चारचाकी वाहने जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्ता जंगली महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, अलका टॉकीज चौक, डेक्कन, पौड रोड, वारजे – माळवाडी, स्वारगेट, कात्रज, हडपसर, बाणेर – बालेवाडी, कोथरूड, मध्यवर्ती भागासाह उपनगरांत लॉकडाऊ कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.