Pune: पुण्यात महत्वाचे विकास प्रकल्प भाजपमुळे रखडले -रवींद्र धंगेकर 

एमपीसी न्यूज – पुण्यातील विकास कामांबाबत दूरदृष्टी आणि काम पूर्ण (Pune )करून घेण्याची धमक नसल्यामुळेच गेली 10 वर्षे केंद्रात, राज्यात व पुण्यात सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्षामुळे पुण्यातील अनेक मोठे प्रकल्प रखडले. मुठा नदी सुधारणा ( जायका ) प्रकल्प, स्मार्ट सिटी, पुण्याची मेट्रो, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, पुण्याहून अनेक शहरांकडे जाणाऱ्या नव्या रेल्वे गाड्या असे कोणतेच प्रकल्प भाजप करू शकले नाही.

मेट्रो तर गेल्या 10 वर्षात पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पुणेकरांचे(Pune) मोठे नुकसान झालेले असून या परिस्थितीत परिवर्तन करीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या काँग्रेसला मतदान यंत्रावरील पंजाच्या चित्रापूढील बटन दाबून विजयी करा, असे आवाहन पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले.

Chinchwad : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अर्चना निवृत्ती गांगड यांना पीएचडी प्रदान

कोथरूड मधील प्रभाग क्र. 11 रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर येथे रविवारी सायंकाळी निघालेल्या विराट पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

कोथरूड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. 11 मधील ही पदयात्रा ना भूतो ना भविष्यती अशी झाली सुमारे4000 हून अधिक कार्यकर्ते व नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते.

पदयात्रेत महिलांचा सहभाग मोठा होता तसेच अनेक ठिकाणी महिला गटागटाने उभ्या राहून रवींद्र धंगेकर यांना ओवाळत होत्या. अनेक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या पदयात्रेत ठिकठिकाणी पथनाट्य आयोजित केली गेली. ‘लोकायत संस्थेतर्फे’ पथनाट्याद्वारे काँग्रेसच्या योजनांची माहिती दिली गेली. याचे सूत्रसंचालन कोथरूड ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझिरे आणि यशराज पारखी यांनी केले. या पदयात्रेचे संयोजन माजी जेष्ठ नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे संतोष डोख व दिपाली डोखयांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह कालच्या रॅलीत प्रवेश केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.