Pune : महापालिकेची उद्या महत्वपूर्ण सभा ; नगरसेवकांची उपस्थिती बंधनकारक

Important meeting of the corporation tomorrow; The presence of corporators is mandatory

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची बुधवारी (दि. 17 जून) महत्वपूर्ण सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेला मागील दोन महिन्यांपासून गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अन्यथा 98 नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार आहे.

कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन असल्याने या नगरसेवकांनी आपल्या प्रभागांतच राहण्यास प्राधान्य दिले. तसेच त्यांनी महापालिकेकडे पाठ फिरविली आहे.

आपले पद वाचविण्यासाठी या नगरसेवकांना जून महिन्यात होणाऱ्या सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे महापालिकेचे तीन महिन्यांपासून कामकाज झालेले नाही. या महिन्यात ‘सोशल डिस्टनसिंग’च्या नियमाचे पालन करून सर्वसाधारण सभा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर आणि आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात सभा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 24 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केला आहे.

त्याचा फटका महापालिकेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. उत्पन्नावर परिणाम होण्यासह शहरातील महत्त्वाची विकासकामेही थांबली आहेत.

एप्रिल आणि मे महिन्यांची महापालिकेची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे झाली नाही. लगेचच या दोन्ही महिन्यातील सभा तहकूब करण्यात आल्या.

बीपीएमसी ऍक्ट 11नुसार मुख्य सभेला सलग तीन महिने गैरहजर राहिल्यास संबंधित नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होते.

त्यामुळे एप्रिल, मे आणि जून महिन्यांत सलग तीन महिने अनुपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. परिणामी जून महिन्यातील सर्वसाधारण सभेला या 98 नगरसेवकांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.