Pune: स्थायी समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक

Pune: Important meeting of the Standing Committee tomorrow सध्या पुणे शहरात कोरोनाचे मोठे संकट आहे. लॉकडाऊन असल्याने तातडीने हा पूल पाडण्यासाठी महापालिकेची 'एनओसी' आवश्यक आहे.

एमपीसी न्यूज- 323 रस्त्यांच्या रुंदीकरणासह, पुणे विद्यापीठ चौकातील2 उड्डाणपूल पाडणे अशा अनेक विषयांवर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर एलेव्हेटेड मेट्रोच्या कामासाठी हे दोन्ही उड्डाणपूल पाडणे आवश्यक आहे. या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 240 कोटी रुपये खर्च येणार आहे.

हा विषय तातडीने मंजूर करावा यासाठी राष्ट्रवादीतर्फे दबाव वाढविण्यात आला आहे. मात्र, पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांनी हा विषय रोखून धरला आहे.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे मोठे संकट आहे. लॉकडाऊन असल्याने तातडीने हा पूल पाडण्यासाठी महापालिकेची ‘एनओसी’ आवश्यक आहे. या पूल बांधणीचा सर्व खर्च राज्य शासन करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

तर, 323 रस्त्यांचे 9 मीटर रुंद करण्याचा विषय हा ठराविक बांधकाम व्यावसायिकांच्याच हिताचा असल्याचा आरोप राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसेने केला आहे. या विरोधी पक्षांनी अजित पवार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.

त्यावर धोरण तयार करण्याचे आदेश पवारांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणारी स्थायी समितीची बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.

सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात महत्वाची बैठक झाली. आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे उपस्थित होत्या. आगामी काळात राष्ट्रवादी भाजप विरोधात आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.