Pune : सातव्या वेतन आयोगासंदर्भात बुधवारी महत्वपूर्ण बैठक होणार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बुधवारी महत्वपूर्ण बैठक होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत दिली.

सातवा वेतन आयोगाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. आठ दिवसांत शासनाला यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्त म्हणाले. तर, सर्वांना विश्वासात घेऊन अहवाल पाठविण्याची विनंती सभागृह नेते धीरज घाटे यांनी केली.

सातवा वेतन आयोग कधी लागू करणार, असा सवाल विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.