Pune : ज्या भागात पाणी येत नाही, तिथे 15 टक्के पाणीपट्टी घेऊ नये -भैय्यासाहेब जाधव

एमपीसी न्यूज – लोहगावसारख्या भागात महिन्यातून 5 ते 6 दिवसच पाणी येते. ज्या भागात पाणी येत नाही, त्या भागात 15 टक्के पाणीपट्टी आकारू नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. ही पाणीपट्टी आकारली तर जनता सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यासंदर्भात जाधव यांनी उपसूचना दिली आहे.

24 बाय 7 योजना गावात राबविणार आहे का? सुमारे 946 कोटी मोबाईल टॉवर कंपन्यांकडे थकबाकी आहे. उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली आहे. यासंबंधी विधी विभाग काय पाठपुरावा करते, 2014 पासून आजपर्यंत काही झालेच नाही. सुमारे 82 कोटी गवरमेट प्रॉपर्टीवर थकबाकी आहे.

सामान्य माणसाला महिन्याला 2 टक्के व्याज लावता. मग, या लोकांना का व्याज लावत नाही?, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. इतर सुमारे 754 कोटी थकबाकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.