Pune : ऑगस्टमध्ये नगरसेवकांना ‘कोरोना’वर बोलण्याची संधी मिळणार

In August, corporators will have the opportunity to speak on the corona : महापालिका प्रशासन व्यवस्थित काम करीत नसल्याचे नगरसेवकांचा आरोप आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सध्या कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. दररोज सात हजारांच्या आसपास चाचण्या करण्यात येत असल्याने 1500 ते 1800 रुग्ण वाढत आहेत. महापालिका प्रशासन व्यवस्थित काम करीत नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. याप्रश्नी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या महापालिका सर्वाधारण सभेत नगरसेवकांना आपले म्हणणे मांडता येणार आहे.

बेडस, आयसीयू, व्हेंटिलेटर, हॉस्पिटल बिल, क्वारंटाईन सेंटर, अशा विविध समस्यांवर नगरसेवकांना बोलायचे आहे. मात्र, महापालिकेच्या सभेत चर्चाच होत नाही. कोरोनाचे कारण देत तातडीने सर्वसाधारण सभा तहकूब केली जाते. त्यामुळे सर्वोपक्षीय नगरसेवकांमध्ये असंतोष खदखदतोय.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य शासनाला विनंती करून प्रत्यक्षात सभा सुरू करू, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नगरसेवकांना दिला.

नगरसेवक हे प्रत्यक्ष फिल्डवर काम करतात. कोरोना रुग्णांच्या समस्या त्यांना माहिती आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्याची गांभीर्याने दाखल घ्यावी, अशी स्पष्ट ताकीद सुद्धा महापौरांनी दिली आहे.

तर, पुढील बैठकीसाठी महापालिका आयुक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केले आहे.

सध्या पुणे शहरात कोरोनाचे 40 हजार 715 रुग्ण झाले आहेत. 24 हजार 246 जणांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

प्रत्यक्षात 15 हजार 434 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 1 हजार 35 जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आणखी कोरोना रुग्ण वाढण्याची भीती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.