BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सेल्फी ताई गल्ली में, कुल ताई दिल्ली में -विजय शिवतारे

एमपीसी न्यूज- आगामी लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती जाणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीचे सर्व उमेदवार दिल्लीत संसदेत जाऊन प्रतिनिधित्व करणार आहेत. मात्र या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून परिवर्तन निश्चित होणार असून ‘सेल्फी ताई गल्ली में, कुल ताई दिल्ली में’ अशा शब्दात शिवसेनेचे नेते मंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. या निवडणुकीत महायुतीच्या कांचन कुल प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार असल्याचे सांगितले.

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पदयात्रेला सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुरूवात झाली. कसबा गणपती, फडके हौद चौक, नरपतगिरी चौक तेथून जिल्हाधिकारी कचेरीजवळ पदयात्रा काढली. त्यानंतर गिरीश बापट यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. यावेळी नरपतगिरी चौकात सभा घेण्यात आली.

यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते मंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महादेव जानकर, शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे, राज्यसभा खासदार संजय काकडे, खासदार अनिल शिरोळे तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.