_MPC_DIR_MPU_III

Pune : लॉकडाऊनमध्ये नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले ई -मेलवर मिळणार

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे प्रतिबंधित क्षेत्र व संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिकांना बँका, पेन्शन, शैक्षणिक अशा विविध कामांसाठी जन्म-मृत्यू दाखला नसल्यामुळे अडचणी येत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी आता हे दाखले संबंधित नागरिकांना त्यांच्या ई -मेलवर पाठविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

या पूर्वी नागरी सुविधा केंद्रातून जन्म-मृत्यू दाखला मिळत होता. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनामुळे हे दाखले मिळणे १ एप्रिल २०२० पासून बंद झालेले आहे. अतिशय महत्वाच्या कामांसाठी नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला आवश्यक असल्यास पुणे महानगरपालिकेच्या जन्म- मृत्यू नोंदणी कार्यालय कसबा पेठ येथील कार्यालयातून ई – मेलद्वारे स्कँन कॉपी देण्यात येईल. त्यासाठी संबंधित नागरिकांनी आपला विनंती अर्ज birthdeathpmc @ gmail,com या ई -मेलवर सादर करावा.

_MPC_DIR_MPU_II

हा अर्ज मराठी, इंग्रजी अथवा हिंदी भाषेत करावा. अर्जामध्ये आपले नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, दाखला कोणत्या आवश्यक कामाकरिता पाहिजे, त्याबाबतचा उल्लेख करावा. अर्जात सुवाच्च व स्पष्ट शब्दात इ- मेल चा उल्लेख करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

तसेच हा अर्ज मा. निबंधक तथा आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, यांच्या नावे ई – मेलवर पाठविण्यात यावा. अर्जात ज्या कारणास्तव दाखला मागणी केली आहे. त्यासंदर्भातील कागदपत्रे पुराव्याकरिता सादर करणे आवश्यक आहे. अर्जदारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन दोन दिवसात अर्जात नमूद केलेल्या केलेल्या ई -मेलवर आयडीवर स्कॅन केलेली कॉपी पाठविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी कृपया ०२०२५५०८४०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी कळविले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.