Pune: लॉकडाऊनमध्येही सुरूच होते कोंढव्यातील ‘हे’ हॉटेल, पोलिसांनी छापा टाकून केली कारवाई

Pune: In Lockdown period kondhwa's hotel night carvers open police raided पोलिसांनी कोंढव्यातील 'हॉटेल नाईट क्रेवेर्स' याठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व हॉटेल्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. पण असे असतानाही काही हॉटेल सुरूच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कोंढव्यातील ‘हॉटेल नाईट क्रेवेर्स’ याठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

पोलिसांनी यावेळी हॉटेल चालविणारा अनुज घनश्याम चौरसिया (वय 34) आणि कुक प्रकाश ताराचंद खत्री (वय 30) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

लॉकडाऊन काळात बंदी असतानाही शासनाचा आदेश झुगारून त्यांनी आर्थिक फायद्यासाठी हॉटेल सुरु ठेवले होते. या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे क. 51(ब), महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 चे नियम 11, संसर्गजन्य कायदा 1897 चे कलम 3 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.