Pune : मावळ गोळीबारप्रकरणी दोषी आढळल्यास राजकारण सोडून देईन – अजित पवार

एमपीसी न्यूज – मावळ गोळीबारप्रकरणी मी दोषी आढळलो तर, राजकारण सोडेन आणि निर्दोष असेल तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी देखील राजकारण सोडावे, अशी भूमिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मांडली. तर ‘दूध का दूध’ आणि ‘पानी का पानी’ होऊन जाऊ द्या. मावळ गोळीबार प्रकरणावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमदेवार मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आज काँग्रेस भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली. मात्र, कार्यकर्त्याची संख्या लक्षात घेता काँग्रेस भवनच्या पटांगणात सभा घेण्यात आली. यावेळी आघाडीतील नेते मंडळी उपस्थित होते.

  • यावेळी अजित पवार म्हणाले की, मावळ गोळीबारप्रकरणी मी कोणालाही आदेश दिले नाही. मी काही बोललो असल्यास त्याबाबत काही जर संभाषण असेल त्यांनी सादर करावे. सीआयडी, सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असून मी एका शेतकऱ्यांचा पोरगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.