Pune : आमच्या दृष्टीने ‘ती’ वारी महत्वाची  : अजित पवार 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिल्लीवरून अजित पवारांनी सुनावले 

एमपीसी न्यूज-शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार (Pune ) संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सुरु झाली आहे.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. त्या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतत दिल्ली वारी होत आहे.त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.वीस जणांचे मंत्रिमंडळ चांगल्या पद्धतीने काम करू शकते .तसेच महिलांना प्रतिनिधित्व न देऊन अपमानित करणे त्यांना योग्य वाटत असेल ,अशा शब्दात शिंदे फडणवीस सरकारवर त्यांनी टोला लगावला.

तसेच ते म्हणाले ,कोणी गुवाहाटी,सुरत,गोवा वारी करावी किंवा आणखी तिसरी वारी करावी.पण आमची माऊली आणि तुकोबांची वारी निघणार आहे.आमच्या दृष्टीने ती वारी महत्वाची आहे.आम्ही साधू संताचा विचार पुढे घेऊन जाणारे लोक आहोत.
 ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मारक असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.त्यावर अजित पवार म्हणाले ,सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल चांगली बोलण्याची अपेक्षा का करता ? आमच्याबद्दल टीकात्मक बोलणे (Pune) हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.