Pune : महापालिकेत समाविष्ट 11 गावांच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 41 ‘अ’ पुरुषमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे आणि ‘ब’ महिलामधून भाजपच्या अश्विनी पोकळे या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एका जागेवर उमेदवार विजयी झाल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती झाल्याचे म्हणावे लागेल.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांसाठी दोन जागांसाठी भाजपकडून अश्विनी पोकळे, शिवसेनेकडून पुरस्कृत अमोल हरपळे आणि राष्ट्रवादीकडून गणेश ढोरे, काँग्रेस पक्षाकडून भाग्यश्री कामठे हे उमेदवार होते. तर, या दोन जागांसाठी काल मतदान पार पडले.

  • यामध्ये एकूण 1 लाख 96 हजार मतदार होते. त्यापैकी 51 हजार 429 जणांनी मतदान केले. त्या आकडेवारीवरून 22 टक्के इतके मतदान झाले. या मतदानाला काही तास होत नाही. तोवर मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये प्रभाग 42 ‘अ’मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे 26 हजार 304 यांना तर शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे यांना 20224 एवढी मते मिळाली.

या आकडेवारीवरून 6 हजाराहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे गणेश ढोरे विजयी झाले. तर ‘ब’मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाग्यश्री कामठे यांना 23 हजार 919 तर भाजपच्या अश्विनी पोकळे 24 हजार 851 या मतांच्या आकडेवारीवरून भाजपच्या अश्विनी पोकळे 932 मतांनी त्या निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

  • या आकडेवारीवरून एका जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी विजयी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत नक्किच चुरशीची होणार असे निश्चित मानले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.