Pune : शहरात कोरोनाचे 1751 रुग्ण, 883 जणांना डिस्चार्ज, 33 मृत्यू

In the city of Corona 1751 patients, 883 discharged, 33 deaths : पुणे शहरात आता कोरोनाचे एकूण 42 हजार 466 रुग्ण झाले आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या बुधवारी 7 हजार 595 टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1751 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 883 जण कोरोनातून बरे झाले. 33 जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात आता कोरोनाचे एकूण 42 हजार 466 रुग्ण झाले आहेत.

पुणे शहरात 25 हजार 129 नागरिकांनी वेळेतच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. 1 हजार 68 नागरिकांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनाव्यतिरिक्त इतरही आजार होते.

शहरात 16 हजार 269 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

मार्केटयार्डमधील 64 वर्षीय पुरुषाचा NICMAR बाणेरमध्ये, गुलटेकडीतील 92 वर्षीय पुरुषाचा राव नर्सिंग होममध्ये, येरवड्यातील 63 वर्षीय महिलेचा, फुरसुंगीतील 54 वर्षीय महिलेचा AICTS हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 86 वर्षीय पुरुषाचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 65 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

शनिवारवाडा परिसरातील 85 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 42 वर्षीय पुरुषाचा, शुक्रवार पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा, राजीव गांधीनगरमधील 59 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, बुधवार पेठेतील 67 वर्षीय पुरुषाचा, अळंदी रोडवरील 63 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 51 वर्षीय पुरुषाचा राव नर्सिंग होममध्ये, फुरसुंगीतील 65 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

भारती विद्यापीठ परिसरातील 59 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 76 वर्षीय पुरुषाचा, मार्केटयार्डमधील 70 वर्षीय पुरुषाचा, बावधनमधील 71 वर्षीय महिलेचा, सिंहगड रोडवरील 63 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शनिवार पेठेतील 72 वर्षीय पुरुषाचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 68 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 55 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तसेच केशवनगरमधील 65 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, लोहगाव रोडवरील 65 वर्षीय पुरुषाचा रायसिंग मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 81 वर्षीय पुरुषाचा देवयानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 51 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कर्वे रोडवरील 64 वर्षीय पुरुषाचा, धनकवडीतील 58 वर्षीय पुरुषाचा, सुखसागरनगरमधील 49 वर्षीय पुरुषाचा, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोंढवा खुर्दमधील 41 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये भारती हॉस्पिटलमध्ये, शिवणेतील 52 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 71 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, घोरपडी पेठेतील 55 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.