Pune : कसबा मतदारसंघावर भगवा फडकवणारच; शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांची बंडखोरी कायम

आबा बागुल, संजय भोसले, रमेश कोंडे यांनी घेतली माघार

एमपीसी न्यूज – कसबा विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवणारच असल्याचा निर्धार करीत शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी आपला अर्ज कायम ठेवला. आपण आता अपक्ष उमेदवार म्हणून कपबशी या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती शिवसेना बंडखोर विशाल धनवडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली. त्यामुळे कासब्यात आता चौरंगी लढत होणार आहे.

काँग्रेसकडून अरविंद शिंदे, भाजप कडून महापौर मुक्ता टिळक, तर मनसेचे अजय शिंदे यांच्यात सामना रंगणार आहे. पर्वती मतदारसंघात काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, खडकवासला मतदारसंघातून जिल्हाप्रमुख रमेश कोंडे तर, वडगावशेरीतुन शिवसेना नगरसेवक संजय भोसले यांनी आज माघार घेतली आहे.

या निवडणुकीत शिवसेनेला एक जागा मिळावी, यासाठी शिवसैनिक आक्रमक होते. पण, भाजपने एकही जागा दिली नाही. त्यामुळे या पक्षाचा प्रचार कसा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केले. पण, विधानसभा निवडणुकीत काहीही मिळाले नाही. त्यामुळेच विशाल धनवडे यांनी बंडखोरी केल्याची चर्चा पुणे शहरात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.