Pune : पुणे विभागात 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्य, तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागातील मार्केटमध्ये  अंदाजे 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची, तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. तसेच  1 हजार 210 क्विंटल फळांची  व  15 हजार 901 क्विंटल कांदा-बटाटयाची आवक   झाली आहे,  अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 21 एप्रिल 2020 रोजी 102.34 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, 22.91 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त म्हणाले, “लॉकडाऊनच्या परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 149 कॅम्प, तर साखर कारखान्यांमार्फत 915 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 1 हजार 64 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 1 लाख 2 हजार 917 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 75 हजार 340 मजुरांना भोजन देण्यात येत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.