Pune : महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे तीन दिवसात 19 कोटी 39 लाख रुपये जमा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे तीन दिवसांत २० हजार ७८२ मिळकतधारकांनी १९ कोटी ३९ लाख २१ हजार ९८९ रुपये जमा केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

मागील वर्षी एप्रिलच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये ३८ कोटी ३४ लाख रुपये मिळकतकर जमा झाला होता. पण, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकडाऊन जाहीर केला आहे. एकूण मिळकतकर प्राप्ती पैकी ९ हजार ८२८ टक्के मिळकत कर ऑनलाईन प्राप्त झाला आहे.

‘ई- मेल’ आणि ‘एसएमएस’व्दारे बिले प्राप्त झाली नाही. त्यांनी अथवा त्यांनी पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या मिळकतकराची बिले भारावी, असे आवाहन मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.