Pune : कोरोनाच्या संकट काळात सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला मदत करावी : महापौर

In times of crisis in Corona, service-oriented, NGOs should help the administration: Mayor :कोरोनाच्या संकट काळात सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला मदत करावी : महापौर

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांनी वैद्यकीय मनुष्यबळासह आवश्यक सोयीसुविधांयुक्त कोव्हीड केअर सेंटर्सची उभारणी करून महानगरपालिकेस हातभार लावावा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

कोव्हीड-१९ विरुध्दच्या लढयात सुजाण नागरिक, सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी मदत करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोव्हीड केअर सेंटर्समध्ये मध्यम लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी लागणारे ऑक्सिजन बेड्‌स आणि आवश्यक कुशल व अकुशल मनुष्यबळ कमी पडत असल्याने उपलब्ध साधन सामग्री अजून वाढविणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. शहरातील सुजाण नागरिक, नागरी संस्था, स्वयंसेवी संस्था, विविध व्यावसायिक संघटना हे देखील कोरोनाविरूद्धच्या लढयात महानगरपालिकेला साथ देत आहेत.

सध्याची कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती आणि रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांना संक्रमणापासून संरक्षित करणे सद्‌यस्थितीस गरजेचे आहे.

त्याचबरोबर शहरातील कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करणे हेही अत्यावश्यक आहे. शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. सद्‌यस्थितीला शहरात एकूण १२ कोव्हीड केअर सेंटर्सची (CCC) उभारणी करण्यात आलेली आहे.

भविष्यात ही संख्या वाढविण्याचा प्रयत्न चालू आहे. या कोव्हीड केअर सेंटर्समध्ये सद्‌यस्थितीस अंदाजे एकूण ४ हजार ८७० बेड्‌स आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी याचा वापर होत असल्याचे महापौरांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like