_MPC_DIR_MPU_III

Pune : दोन महिन्यात 33 हजार फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे मंडळाकडून राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी अभियानात मागील दोन महिन्यात 33 हजार 503 फुकट्या प्रवाशांकडून 2 कोटी 10 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे रेल्वे मंडळाच्या पुणे-मळवली, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर विभागात हे अभियान राबविण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

रेल्वे विभागाकडून नियम मोडणा-या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. नियमभंग करणा-या प्रवाशांवर एप्रिल, मे महिन्यात कारवाई अभियान राबविण्यात आले. यामध्ये एकूण 74 हजार 535 घटना समोर आल्या. त्या सर्व घटनांमध्ये 4 कोटी 8 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये 33 हजार 503 प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले. त्यांच्याकडून 2 कोटी 10 लाख 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • ही कारवाई रेल मंडळ प्रबंधक मिलिंद देऊस्कर, अपर मंडळ रेल प्रबंधक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली तिकीट निरीक्षक, सुरक्षा बलाचे अधिकारी यांनी राबविले.

कारवाईची ही मोहीम रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे राबविण्यात येत आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा, अन्यथा आर्थिक दंड अथवा कारावासाची शिक्षा होऊ शकते. असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.