Pune : ‘पर्वती’ येथे नमो चषक अंतर्गत बास्केटबॅाल स्पर्धेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – भारतीय जनता युवा मोर्चाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या (Pune) वतीनं नमो चषक 2024 अंतर्गत आयोजित बास्केटबॅाल (3×3) स्पर्धेचे उदघाटन भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. भारताचं भविष्य असणाऱ्या युवा पिढीचं मानसिक आणि शारिरीक स्वास्थ उत्तम राहावं, या उद्देशानं राज्यभर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले.

PCMC : पाणीपुरवठा योग्य दाबाने करा; जनसंवाद सभेत मागणी

यावेळी श्रीफळ वाढवून स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि खेळाडुंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, दिपक उर्फ बाबा मिसाळ, करण मिसाळ, नेहा दामले, रोहन दामले, प्रशांत दिवेकर, श्रावणी जगताप, निखिल शिळीमकर, आनंद रिठे, विश्वास ननावरे, अजय भोकरे, जितेंद्र पोळेकर, राजू कदम, आनंद रिठे, मंगेश शहाणे, प्रशांत थोपटे, विनया बहूलीकर, तेजस गाडे, औदुंबर कांबळे, अजय जगताप तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.