Pune : इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : पुण्यातील इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन (Pune) प्रसिद्ध उद्योजक अभय फिरोदिया यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वीस बिझनेस हब इंडियाचे प्रमुख फ्लोरिन म्युरल, नेटूर टेक्निकल ट्रेनिंग फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक रेगुराज, इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्सचे संस्थापक संचालक प्रकाश आपटे, फाईन ऑर्गनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक जयेन शाह, स्वीस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सतीश राव, इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्सचे संचालक व वेकफिल्डचे अध्यक्ष मुकेश मल्होत्रा, इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्स व वेकफिल्डचे संचालक अश्विनी मल्होत्रा, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्स, पुणे हे नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथे स्थापन करण्यात आले. कौशल्याधारित समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने या सेंटरची स्थापना करण्यात आली असून जागतिक दर्जाची सर्वोत्तम शिक्षण प्रणाली म्हणून ओळखली जाणारी स्विस व्यावसायिक शिक्षण प्रणाली अर्थात स्वीस वेटच्या धर्तीवर या ठिकाणी व्यावसायिक अPuभ्यासक्रम चालविले जाणार आहेत.

Pune : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

कौशल्यपूर्ण भारत, मेक इन इंडिया अंतर्गत पुढाकार, ग्रामीण युवक व युवतींची रोजगार क्षमता वाढविणे, कृषी उत्पादकता वाढवणे आणि शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर या प्रमुख बाबींवर आधारित (Pune) शैक्षणिक व्यावसायिक अभ्यासक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतील. याबरोबरच आजच्या पिढीला भविष्यासाठी आवश्यक अशी कौशल्ये शिकविण्यावर आम्ही भर देऊ असे प्रतिपादन सेंटरचे अध्यक्ष मुकेश मल्होत्रा यांनी केले.

एक्सलन्स सेंटरमधील अभ्यासक्रमांबद्दल माहिती देताना मल्होत्रा पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुण- तरुणींना आधुनिक कृषी पद्धती, कृषी-उद्योजकता या विषयांवर माहितीबरोबरच कृषी उपकरणे यांची देखभाल व दुरुस्ती यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याद्वारे प्रशिक्षित उमेदवाराला दरवर्षी किमान रु. 2.5 लाख ते रु. 3 लाख कमविण्यास सक्षम करणे हे या मागील मुख्य उद्दिष्ट आहे. नजीकच्या भविष्यात सेंटर ऑफ एक्सलन्स, अॅग्रीकल्चर (सीईए) येथे ड्रोन पायलट प्रशिक्षणाचे वर्गही सुरू होतील, असेही मल्होत्रा म्हणाले.

नेटूरच्या सहकार्याने नजीकच्या भविष्यात इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्स हे आशिया खंडातील महत्त्वपूर्ण सेंटर म्हणून समोर येईल, असा विश्वास यावेळी रेगुराज यांनी व्यक्त केला. नेटूरच्या देशभरातील 20 सेंटरच्या माध्यमातून दरवर्षी 4000 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात तसेच या विद्यार्थांना उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात असेही रेगुराज यांनी नमूद केले. स्वित्झर्लंड, जर्मनी आणि जपान या देशांत उत्पादनांची गुणवत्ता ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्स हे देखील अशाच प्रकारे काम करेल असे अभय फिरोदिया म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.