Pune : सार्वजनिक पाणपोई, सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाटन

एमपीसी न्यूज – पुणे लष्कर भागातील भीमपुरा गल्ली नंबर १५ मध्ये शिवसेवा भीमसेवा प्रतिष्ठान आणि जोगेश्वर मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन शशिधर पुरम आणि स्व . डॉ. रमेश संचेती यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाटन स्वाती पत्ती यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेवा भीमसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे व राजेश पुरम यांनी केले. या कार्यक्रमास विनायक काटकर, पुरुषोत्तम पिल्ले, आकाश चव्हाण, सूरज पैलवान, सुमित गावडे, सुरेश आगुरेड्डी, अजीम गुडाकूवाला, अक्रम शेख, रोहन गायकवाड, इरफान मुल्ला, रिजवान सय्यद, राहुल तांबे, राहुल भिसे, ओंकार नाझरे, राजाभाऊ अंकुश, विजय खंडे व रफिक शेख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.