Pune : संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे नव्या वर्षी उद्घाटन

एमपीसी न्यूज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पालखी मार्गाची (Pune) हवाई पाहणी केली. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे सद्यस्थितीला 85 टक्के काम पूर्ण झाले असून कामाची गती लक्षात घेता काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊन नवीन वर्षात पालखी मार्गाचे उद्घाटन होईल, अशी माहिती दिली.  तसेच या कामाबाबत ते समाधानी असल्याचेही त्यांनी म्हंटले. 

सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.

Pune Crime : आरटीओ अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका एजंटला अटक

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये (Pune) विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात 57,200 व दोन्ही बाजूस मिळून 18,840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.