BNR-HDR-TOP-Mobile

Pune : प्राप्तिकर विभागाची 42 मतदारसंघांवर राहणार करडी नजर

क्विक रिस्पॉन्स टीमची स्थापना

406
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत होणा-या काळ्या पैशांच्या वापराला आळा बसावा यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची (क्विक रिस्पॉन्स टीम) स्थापना केली आहे. प्राप्तिकरच्या पुण्यातील कार्यालयातून मुंबई वगळता राज्यातील 48 पैकी 42 लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाचे (तपास) महासंचालक दीपक कपूर यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काळ्या पैशाचा वापर होऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाने सतर्क राहावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्राप्तिकर विभागाने तपास यंत्रणा आणि गुप्तचर विभागाला दक्षतेचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. सहायक आयुक्त अथवा उपायुक्तांच्या देखरेखीखाली पाच अधिका-यांचे पथक यात असेल. त्या माध्यमातून मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे अथवा मौल्यवान वस्तूंच्या वापरावर नजर ठेवली जाणार आहे.

तक्रार करण्यासाठी अथवा माहिती देण्यासाठी 18002330700 अथवा 18002330701 या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय 7498977898 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अवघ्या अर्ध्या तासात कारवाई केली जाईल.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3