Pune : एक लाखाची लाच स्वीकारताना आयकर अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- आयकर कमी करून देण्यासाठी एका बिल्डरकडून एक लाखांची लाच स्वीकारताना एका आयकर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे शाखेने मंगळवारी रात्री सॅलिसबरी पार्क परिसरात ही कारवाई केली. याबाबतची माहिती सीबीआयचे अधीक्षक एम. आर. कडोले यांनी दिली.

पुण्यातील एका बिल्डरचा आयकर कमी करून देण्यासाठी संबंधित आयकर अधिकाऱ्याने एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार सीबीआयकडे करण्यात आली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने मंगळवारी (दि. 4) रात्री सॅलिसबरी पार्क येथील आयकर कार्यालयामध्ये सापळा रचून संबंधित आयकर अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून ही कारवाई सुरू होती. या अधिकाऱ्याला आज, बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.