Pune : पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ; एकूण रुग्णसंख्या 734

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही वाढ झाली. दुपारपर्यंत 719 कोरोनाबाधित होते. त्यात आणखी वाढ होऊन ही संख्या सायंकाळी सात पर्यंत 734 वर पोहोचली. यामध्ये पुणे शहरात 625, पिंपरी – चिंचवडला 58, ग्रामीण भागातील 51 कोरोना बाधित रुग्णांचा समावेश असल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. तर, आतापर्यंत 50 नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे आणि पिंपरी – चिंचवड या दोन्ही महापालिकांनी संपूर्ण शहरातील परिसर सील केला आहे.

पुणे शहरात वाढते कोरोनाचे रुग्ण लक्षात घेऊन पोलिसांनीही कडक उपाययोजना केल्या आहेत. सोमवारी दुपार पासून दिलेले पासही रद्द केले. पुढील सात दिवस त्याची अंमलबजावणी होणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी वेळही ठरवून देण्यात आली आहे. सील केलेल्या भागांत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू राहणार आहेत.

पुणे शहरातील रस्ते जागोजागी सील करण्यात आले आहे. नागरिकांना वारंवार आवाहन करूनही भटकंती सुरूच असल्याचे चित्र दिसून येत होते. आता या अतिउत्साही नागरिकांना बाहेर निघताच येणार नाही, असे कडक नियोजन पोलिसांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह – 734

पुणे महापालिका – 625

पिंपरी चिंचवड महापालिका – 58

पुणे ग्रामीण – 51

पुणे शहरातील रुग्णालय निहाय मृतांची संख्या
ससून = 41
जिल्हा रुग्णालय = 1
वायसीएम = 1
नोबेल = 2
जहांगीर = 1
सह्याद्री = 1
नायडू = 1
इनामदार = 1
पूना हॉस्पिटल = 1
एकूण मृत्यू = 50

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.