Pune : महिन्याला रु. 600 ची भाडेवाढ देण्यास तयार; शिवराय विचार पथारी संघटनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – शिवराय विचार पथारी संघटना महिन्याला रु. 600 रुपये भाडेवाढ देण्यास तयार असल्याचे अध्यक्ष रवींद्रअण्णा माळवदकर यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

आपल्या मागणीबाबत बोलताना ते म्हणाले की, आमचे सभासद लक्ष्मी रोड – बेलबाग चौक ते भानुविलास टॉकीजपर्यंत आणि बाजीराव रोड – शनिपार ते नगरकर तालीम, बँक ऑफ महाराष्ट्रसमोर आणि मंडई परिसरात व्यवसाय करतात. हा शहरातील प्रमुख प्रवासी वर्दळीचा भाग आहे. त्यात आमचे केवळ 1 टक्केच गिऱ्हाईक असते. दिवाळी, 15 एप्रिल ते 15 मे एवढ्याच कालावधीत ग्राहक असतो. बाराही महिने नसतो आणि आम्हाला तर भाडे 12 महिने म्हणजे 365 दिवसांचे भाडे भरायचे आहे. गणपती उत्सव, पालखी, मोर्चे, मिरवणुका, उन्हाळा, पावसाळा, यावेळी गिऱ्हाईक अत्यल्प असतो. त्यामुळे महिन्याला 3 हजार रुपये भरणे शक्य नाही. कदाचित धंदे बंद करून उपासमार स्वीकारावी लागेल. त्यामुळे आम्हाला भाडे दर महिना 20 रुपये आहे. त्याऐवजी दर महिना 600 रुपये भाडेवाढ देण्यास तयार आहोत.

त्यासाठी मागील भाडे माफ करून नवीन वर्ष म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून दर महिना 600 रुपये भाडे घ्यावे, अशा अर्थाचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. सर्वपक्षीय गटनेत्यांही हे निवेदन देण्यात आले आहे. पुणे महापालिकेने केलेली मूळ भाडेवाढ आणि आता कमी केलेली भाडेवाढ संघटनेच्या वतीने वेळोवेळी महापालिका आयुक्त, महापौर, अतिक्रमण उपायुक्त यांच्याकडे तोंडी आणि लेखी नाकारले आहे. ही भूमिका आमची नवीन नाही. भाडेवाढीवर एकमत होत नाही, तोपर्यंत महापालिका प्रशासनातर्फे जबरदस्तीने कारवाई करण्यात येऊ नये, असेही माळवदकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.