Pune : ओढ्यांच्या पात्रांची खोली वाढवा -योगेश खैरे

एमपीसी न्यूज – मागील वर्षी पुणे शहरात विशेषतः कात्रजपासून उगम पावणाऱ्या ओढ्यांना आलेल्या पुरामुळे भयानक परिस्थितीत निर्माण झाली होती. याला मुख्य कारण ओढ्यांची उथळ झालेली पत्र हे होत. त्यामुळे ओढ्यांच्या पात्रांची खोली वाढविण्यात यावी, अशी मागणी मनसेचे पुणे शहर सचिव योगेश खैरे यांनी केली आहे. त्यासंदर्भातील निवेदन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले आहे.

या उथळ पात्रांमुळे ओढ्यातील पाणी पात्राबाहेर पडून अनेक वस्त्या आणि इमारतीत शिरूर हाहाकार उडाला होता. पुणे शहरात येणाऱ्या अनेक ओढ्यांची पात्र राडारोडा आणि गाळामुळे अजूनही उथळच आहेत. आता येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही ओढ्यांची पात्र त्यातील गाळ आणि राडारोडा काढून खोल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

अचानक मोठा पाऊस झाल्यास पुन्हा मागील वर्षी सारखी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळी महापालिका यंत्रणा त्या कामात गुंतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.