Pune : क्षेत्रीय कार्यालयानुसार ‘कोरोना’ हेल्पलाईन क्रमांकची संख्या वाढवावी -दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’, लॉकडाऊन काळात उपलब्ध करून देण्यात आलेली हेल्पलाईन क्रमांकचा लाभ बऱ्याचदा गरजुंना घेता येत नाही, त्यामुळे पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयानुसार ‘कोरोना’ हेल्पलाईन क्रमांकची संख्या वाढवावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे. त्यासंबंधीचे पत्र आयुक्तांना देण्यात आले आहे.

धुमाळ यांनी म्हटले आहे कि, पुणे महापालिकेच्या वतीने हद्दीतील गरजू ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना अन्न, औषधे व अतिआवाश्यक सेवा त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध करून देण्यासाठी जो उपक्रम राबविला आहे, तो महत्वपूर्ण आहे. मात्र, या उपक्रमाचा हेल्पलाईन नंबर 020 – 25501285 हा एकच आहे.

पुणे शहरातील गरजू व्यक्तींना हा नंबर खूप वेळा लागत नाही, व्यस्त लागतो आणि काही वेळा लागतच नाही. त्यामुळे या चांगल्या उपक्रमाचा लाभ गरजू व्यक्तींना लाभ घेता येत नाही. अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेच्या मध्यवर्ती कार्यालया व्यतिरिक्त शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयानुसार या नंबरची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे.

पुणे महापालिका आपत्कालीन सहाय्यक निधी पेटीएम व गुगल पे माध्यमातून स्वीकारण्यात यावा, अशीही मागणी महापालिका आयुक्तांकडे दीपाली धुमाळ यांनी केली आहे. कोरोना विरुद्ध लढ्यात योगदान देण्यासाठी अनेकांची इच्छा आहे. मात्र, त्यांना लॉकडाऊनमुळे बँकेत जाता येत नाही. बऱ्याच नागरिकांची ऑनलाइन बुकिंग सुविधा सुरू नाहीत. त्यात त्रुटी आहेत. सामान्य नागरिकांना आरटीजीएस (RTGS) आणि आयएमपीएस (IMPS) करणे अवघड जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.