Pune: कोरोनाच्या संकटामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीजयोद्धांचा होणार स्वातंत्र्यदिनी गौरव

Pune: Independence Day will be celebrated for the best performers in the Corona crisis for mahavitran संसर्गाचा धोका टाळून किंवा झाल्यास त्याचा यशस्वी मुकाबला करून तसेच कोरोना संकटामुळे अनेक मर्यादा असताना अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात आपात्कालीन परिस्थितीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुणे प्रादेशिक कार्यालयस्तरावर येत्या स्वातंत्र्यदिनी विशेष गौरव करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपाययोजना सुरु आहे. लॉकडाऊनच्या कालावधीपासून रुग्णालयांसह विविध विभागांची महत्वाची कार्यालये, इतर अत्यावश्यक सेवा तसेच घरून काम (वर्क फ्रॉम होम) करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 24 तास सुरळीत वीजपुरवठा देण्याचे कर्तव्य महावितरणचे अभियंता व तांत्रिक कर्मचारी अविश्रांत व युद्धपातळीवर बजावत आहेत.

तांत्रिक बिघाड झाल्यावर तसेच अवकाळी वादळी पाऊस व ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा आदींमुळे वीजयंत्रणेची मोठी हानी झाली तरी अहोरात्र कामे करून कमीतकमी वेळेमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत.

संसर्गाचा धोका टाळून किंवा झाल्यास त्याचा यशस्वी मुकाबला करून तसेच कोरोना संकटामुळे अनेक मर्यादा असताना अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

या कामगिरीची दखल घेऊन पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुणे प्रादेशिक कार्यालयस्तरावर येत्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

यासाठी आठ मंडल कार्यालय अंतर्गत प्रत्येकी एक शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचारी निवडण्यात येणार आहे. त्यासाठी रास्तापेठ, गणेशखिंड, पुणे ग्रामीण, बारामती, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली मंडल कार्यालयांकडून अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची या गौरवासाठी निवड करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.