Pune: सावधान! कोरोनाबाधित ‘टॉप 20’ देशांमध्ये भारताचा समावेश, 22 वरून 19 व्या स्थानावर

एमपीसी न्यूज – भारतात लॉकडाऊन सारखी कडक उपाययोजना करूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत गेल्या महिन्यात 41 व्या स्थानावर असलेला भारत आता 19 व्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. गेेले काही दिवस भारत 21 किंवा 22 व्या क्रमांकावर होता. मात्र आज आयर्लंड, स्वीडन व दक्षिण कोरिया या तीन देशांना मागे टाकत एकदम 19 व्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. भारतासाठी ही फार मोठी धोक्याची घंटा आहे.

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काल एका दिवसात 1,034 ने वाढली असून 11 हजार 487 इतकी झाली आहे. मृतांचा आकडा 35 ने वाढून 393 इतका झाला आहे. भारतात आतापर्यंत 1 हजार 359 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 9 हजार 735 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत.  भारतात आतापर्यंत एकूण 2 लाख 44 हजार 893 कोरोना निदान चाचण्या झाल्या आहेत. दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांचे प्रमाण 177 इतके आहे तर कोरोनाबाधितांचे प्रमाण दहा लाख लोकसंख्येमागे आठ इतके झाले आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ही संख्या खूप लहान असली तरी कोरोना हा झपाट्याने पसरणारा संसर्गजन्य रोग असल्याने तसेच त्यावर अजूनही खात्रीशीर औषध व प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने काळजी घेणे एवढाच पर्याय भारतीयांपुढे आहे. 

याच परिस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढवून 40 दिवसांचा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन केल्याने अन्य देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाची आकडेवारी आटोक्यात असल्याचे दिसत आहे. यापुढील धोका टाळण्यासाठी आता अधिक कडक उपाययोजना करण्याची वेळ भारतावर आली आहे.

कोरोनाबाधित टॉप-20 देशांतील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 6,13,886 (+26,945), मृत 26,047 (+2,407)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 174,060 (+3,961), मृत 18,255 (+499)
  3. इटली – कोरोनाबाधित 1,62,488 (+2,972), मृत 21,067 (+602)
  4. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,43,303 (+6,524), मृत 15,729 (+762)
  5. जर्मनी – कोरोनाबाधित 1,32,210 (+2,138), मृत 3,495 (+301)
  6. यू. के. – कोरोनाबाधित 93,873 (+5,252), मृत 12,107 (+778)
  7. चीन – कोरोनाबाधित  82,249 (+89), मृत 3,341 (+0)
  8. इराण – कोरोनाबाधित 74,877 (+1,574), मृत 4,683 (+98)
  9. टर्की – कोरोनाबाधित 65,111 (+4,062), मृत 1,403 (+107)
  10. बेल्जियम – कोरोनाबाधित 31,119 (+530), मृत 4,157 (+254)
  11. नेदरलँड – कोरोनाबाधित 27,419 (+868) , मृत 2,945 (+122)
  12. कॅनडा – कोरोनाबाधित 27,063 (+1,383), मृत 903 (+123) 
  13. स्वित्झर्लंड – कोरोनाबाधित 25,936 (+248), मृत 1,174 (+36)
  14. ब्राझील – कोरोनाबाधित 21,102 (+2,774), मृत 1,532 (+204)
  15. रशिया – कोरोनाबाधित 21,102 (+2,774), मृत 170 (+22)
  16. पोर्तुगाल – कोरोनाबाधित 17,448 (+514), मृत 567 (+32)
  17.  ऑस्ट्रीया – कोरोनाबाधित 14,226 (+185), मृत 384 (+16)
  18. इस्राईल – कोरोनाबाधित 12,046 (+460) , मृत 123 (+7)
  19. भारत – कोरोनाबाधित 11,487 (+1,034) , मृत 393 (+35)
  20. आयर्लंडकोरोनाबाधित 11,479 (+832) , मृत 406 (+41) 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.