Pune : गुरुपौर्णिमेनिमित्त ‘कला वर्धिनी’ तर्फे मंगळवारी ‘अनुग्रह ‘ नृत्य कार्यक्रम

एमपीसी न्यूज- गुरुपौर्णिमेनिमित्त कला वर्धिनी’ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मंगळवारी (दि. 16) ‘अनुग्रह ‘ हा नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांच्या 10 शिष्या ‘तंजावूर नृत्य प्रबंध’ ही विशेष नृत्य संकल्पना ‘अनुग्रह ‘ या कार्यक्रमात सादर करणार आहेत .

डॉ. सुचेता भिडे -चापेकर या देखील ‘गुरु ‘ संकल्पनेवर नृत्य सादर करणार आहेत. डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांची कन्या, शिष्या आणि ‘कला वर्धिनी’ चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव अरुंधती पटवर्धन यांनी पत्रकाद्वारे या कार्य्रक्रमाची माहिती दिली. भारतीय विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहात सायं ६ वाजता हा कार्यक्रम होईल.

तंजावूर राजघराण्याचे १४ वे वंशज प्रतापसिंहराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ‘अनुग्रह’ चे हे सहावे वर्ष आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.