Pune : पं. श्रीनिवास जोशी, विराज जोशी, विशेष गायक वंडरबाॅय पृथ्वीराज यांची शुक्रवारी शास्त्रीय संगीत मैफल

एमपीसी न्यूज- पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी तसेच विशेष गायक वंडरबाॅय पृथ्वीराज यांची
‘सुगंध सुरांचा’ या शास्त्रीय संगीत गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. पृथ्वीराज थिएटर्स तर्फे येत्या शुक्रवारी (दि. 11) संध्याकाळी 5 वाजता नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, येथे ही मैफल रंगणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

या मैफिलीमध्ये तबल्यावर सचिन पावगी व प्रज्वल दराडे, तानपुऱ्यावर रोहित चौधरी, संवादिनीवर गंगाधर शिंदे आणि गीताराम दराडे साथसंगत करतील.  कार्यक्रमाचे निवेदन डॉ. बिना शहा करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून या कार्यक्रमाला पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील नामवंत कलावंत उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.