Pune : आयुर्वेदिक भस्म विचारमंच स्थापनेसाठी इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशनचा पुढाकार

'आयुर्वेदिक भस्म विचारमंच' संशोधनावर भर देणार

एमपीसी न्यूज- आयुर्वेदिक भस्मे एक उपयुक्त औषधी कल्पना असून हि सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आयुर्वेदिक भस्म करण्याच्या पद्धती, चांगल्या कच्चा मालाची उपलब्धता, त्यांची शुध्दता अशा बऱ्याच बाबींचा उहापोह करणे आवश्यक आहे. त्यासाठी भस्मे तयार करणारे व वापरणारे वैद्य व कारखाने यांनी एकत्र येवून त्यावर विचारांचे आदान प्रदान करणे आवश्यक आहे. या हेतूने पुण्यात शनिवारी (दि. 1) आयुर्वेदिक भस्म विचारमंच स्थापनेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशनने त्यासाठी पुढाकार घेतला.

या बैठकीला डॉ. उल्हास जोशी, डॉ. जयंत अभ्यंकर, डॉ. मंदार अक्कलकोटकर, डॉ. गुरुप्रसाद कुलकर्णी, डॉ. अजित जोशी यांच्यासह 25 संशोधक, वैद्यकीय व्यावसायिक, आयुर्वेदाचे विद्यार्थी उपस्थित होते.

आयुर्वेदिक भस्मे एक उपयुक्त औषधी कल्पना असून हि सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आयुर्वेदिक भस्म करण्याच्या पद्धती, चांगल्या कच्चा मालाची उपलब्धता, त्यांची शुध्दता अशा बऱ्याच बाबींचा उहापोह करणे आवश्यक आहे. त्यासाठी भस्मे तयार करणारे व वापरणारे वैद्य व कारखाने यांनी एकत्र येवून त्यावर विचारांचे आदान प्रदान करणे आवश्यक आहे .इंडियन ड्रग्ज रिसर्च असोसिएशन असा एक कायमचा विचारमंच तयार करणार आहे, असे डॉ. उल्हास जोशी यांनी सांगितले. ही संशोधन संस्था 60 वर्षे करीत असलेल्या कामाची माहिती देण्यात आली.

स्टँडर्डायझेशनचा आग्रह धरावा, रुग्णांना उपयोग व्हावा, भस्माच्या तीव्रतेचे परिणाम (टॉक्सिसिटी) यावर संशोधन झाले पाहिजे, अशी मते उपस्थितांनी मांडली. कच्चा मालाची गुणवत्ता, परिणामकारकता, भस्मावर जी प्रक्रिया केली जाते, स्टँडर्डायझेशन, सरकारी नियम त्यावर अधिक संशोधन व्हावे. भस्म सर्वत्र स्वीकारली जावीत यासाठी काय करता येईल यावर विचार करण्यात आला. भस्माची व्याख्या करणे, कच्या मालाची शुद्धता, उपलब्धता आदि विषयांवर चर्चा झाली. पुढील सत्र २९ फेब्रुवारी २०२० रोजी करण्याचे ठरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.