_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : भारतीय मजदूर संघाचे केंद्र सरकार विरोधात ‘सरकार जगाओ’ अभियान

Indian Trade Unions 'Awake Government' campaign against the Central Government

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाच्या वतीने काल देशपातळीवर केंद्र सरकार विरोधात ‘सरकार जगाओ’ अभियान करण्यात आले. वीजवितरण, पारेषण आणि निर्मिती या तीनही वीज कंपनीतील कायम आणि कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

सर्व राज्यातील विज ऊद्योग कंपनीतील कायम आणि कंत्राटी कामगारांनी त्यांच्या कार्यालया समोर उभे राहून हे आंदोलन करण्यात आले.

केंद्रसरकार कडून वीज उद्योगात खाजगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे याला भारतीय मजदूर संघाचा विरोध आहे. अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाने सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत.

या आहेत प्रमुख मागण्या 

_MPC_DIR_MPU_II
  • केंद्र शासनाने नवीन विद्युत कायदे कामगारांच्या विरोधामध्ये लागू करण्याचा जो विचार केलेला आहे त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे.
  • देशामध्ये एक उद्योग एक वेतन या नीतीचा अवलंब झाला पाहिजे.
  • सर्व कंत्राटी कामगारांना प्रथम वीज कंपन्यांमध्ये कायम करून घ्यावे.
  • वीज कंपन्यात नवीन भरती करण्यापुर्वी  अनुभवी कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे व वर्षानुवर्षे काम करणार्या कंत्राटी कामगारांनाच प्राधान्य द्यावे
  • या कामगारांना वयामध्ये सवलत आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले पाहिजे.

भारतीय मजदूर संघाच्या या  प्रमुख मागण्या आहेत. या व इतर मागण्यांच्या पार्श्र्वभूमीवर केंद्र शासनाला जागे करण्यासाठी आज देशभर ‘सरकार जगाओ’ अभियाना अंतर्गत निदर्शने व आंदोलने करण्यात आली.

पुणे मंडळ मधील कायम आणि कंत्राटी कामगारांनी आज निदर्शने केली. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. याप्रसंगी वीज कामगार महासंघाचे  पदाधिकारी उपमहामंत्री  विजय हिंगमिरे, पुणे झोन अध्यक्ष तुकाराम डिंबळे, कामगार महासंघाचे उपाध्यक्ष मुकुंद त्र्यंबके, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष  निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री राहुल बोडके आणि कोषाध्यक्ष सागर पवार यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.