Pune : सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईनला इंडियाज सिग्नेचर ब्रँड पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – मिशवा प्रॉडक्शन्सच्या वतीने दिला जाणारा ‘इंडियाज सिग्नेचर ब्रँड’ पुरस्कार सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फाशीं टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांना मिळाला आहे. गोवा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अभिनेते सुनील शेट्टी व गोव्याचे नगरविकास व कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले.

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या कुलसचिव नूतन जाधव व एसआयएफटीच्या प्राध्यापिका मोनिका कर्वे यांनी पुरस्कार स्वीकारला. संस्थेच्या दोन महाविद्यालयांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सूर्यदत्ता संस्थेच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी प्राध्यापक रेणुका घोसपुरकर व प्राध्यापक मोनिका कर्वे म्हणाल्या, डिझाईन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहोत. त्यासाठी पाठ्यक्रमाबरोबरच प्रात्यक्षिक आणि क्षेत्रभेटीवर भर दिला जातो. ला-क्लासे वार्षिक फॅशन शो, स्पार्क प्रदर्शन घेतले जाते. या दहा वर्षात विविध संकल्पनावर हे उपक्रम झाले आहेत. यंदा खादी संकल्पनेवर आधारित प्रदर्शन व फॅशन शो झाला.

या प्रदर्शनात एक हजारपेक्षा अधिक खादीच्या वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या. त्याची नोंद झाली आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढावी, यासाठी समाजातील अनेक महिलांना प्रशिक्षण दिले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.