Pune : ‘इंडस्ट्री 4.0 नंतरचे जीवन ‘ या विषयावर शनिवारी राष्ट्रीय परिसंवाद

एमपीसी न्यूज- ‘इंडस्ट्री 4.0 नंतरचे जीवन‘(एज्युकेशन ,वर्क अँड लाईफ बियॉंड इंडस्ट्री 4.0) या विषयावर डॉ पी ए इनामदार फौंडेशन तर्फे शनिवारी (दि.19) आझम कॅम्पस मैदान (पुणे कॅम्प) येथे राष्ट्रीय परिसंवाद आयोजन करण्यात आला आहे. महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार, संयोजक डॉ आर गनेसन यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. हा परिसंवाद आझम कॅम्पसच्या मैदानावर संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे.

संजय सहाय (अतिरिक्त पोलीस महासंचालक ,कर्नाटक),श्रीनिवास नारायण (कार्यकारी उपाध्यक्ष नोउस इन्फोसिस्टीम, वरदराजू जनार्दनन (इन्होवेशन लॅब्स), विन्नी जोहरी (संचालक, एज्युकेशन एडव्होकसी, मायक्रोसॉफ्ट ) हे मान्यवर या परिसंवादात सहभागी होणार आहेत.

इंडस्ट्री 4.0 या क्रांतिकारक टप्प्यावर सर्वांचेच आयुष्य बदलून जाण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या बदलांचा शैक्षणिक ,सामाजिक ,औद्योगिक,आर्थिक बदलांचा वेध घेवून त्यासाठी सज्जता करण्याचे नियोजन प्रत्येकाला करता यावे, अशी चर्चा या परिसंवादात होणार आहे, असे डॉ पी ए इनामदार यांनी सांगितले. शैक्षणिक ,सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांना, विद्यार्थी, शिक्षकांना यामध्ये निमंत्रित करण्यात आले आहे. या परिसंवादासाठी सर्वाना विनामूल्य प्रवेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.